
भैरवनाथ सोसायटीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब गायकवाड; उपाध्यक्षपदी पंडित गायकवाड
केसनंद ता. २९ : डोंगरगाव (ता. हवेली) येथील भैरवनाथ सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच बाबासाहेब गायकवाड; तर उपाध्यक्षपदी पंडित गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.
भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पेरणे फाटा येथे संस्थेच्या कार्यालयात झाली. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने अध्यक्षपदी बाबासाहेब गायकवाड;तर उपाध्यक्षपदी पंडित गायकवाड यांची बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष तळपे यांनी जाहीर केले. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर वाळके, माजी सरपंच विक्रम गायकवाड, माजी अध्यक्ष नारायण गायकवाड, दशरथ कामठे, संतोष गायकवाड, गोरक्ष गायकवाड, दत्तात्रेय वाळके, सुदर्शन निकाळजे आदी उपस्थित होते.