Sat, Sept 30, 2023

हरभरा पीक स्पर्धेत
संपतराव गव्हाणे प्रथम
हरभरा पीक स्पर्धेत संपतराव गव्हाणे प्रथम
Published on : 19 May 2023, 1:21 am
कोरेगाव भीमा, ता. १८ : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी संपतराव गंगाराम गव्हाणे यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत घेतलेल्या हरभरा पीक स्पर्धेत शिरूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
प्रयोगशील शेतीसह सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले भाजप शिरूर तालुका चिटणीस संपतराव गंगाराम गव्हाणे तसेच त्यांच्या पत्नी व कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या सदस्या मनिषा संपतराव गव्हाणे यांनी शेतीत कुटुंबीयांसह हरभरा पिकासाठी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक होत आहे.