Wed, Sept 27, 2023

केसनंद येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
केसनंद येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Published on : 28 May 2023, 2:30 am
केसनंद, ता. २८ : लोणीकंद -केसनंद रस्त्यावर केसनंद हद्दीत जोगेश्वर मंदिरासमोरील वळणावर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला.
विशाल ऋषीमुनी गोंड (वय २३, रा. डोमखेल वस्ती, वाघोली) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. दुपारी तीनच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाविरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.