शंभुभक्तांचा प्रवास होणार सुखकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शंभुभक्तांचा प्रवास होणार सुखकर
शंभुभक्तांचा प्रवास होणार सुखकर

शंभुभक्तांचा प्रवास होणार सुखकर

sakal_logo
By

कोरेगाव भीमा, ता. ३१ : चौफुला ते केंदूर, केंदूर ते पाबळ आणि पुणे-आळंदी-केंदूर-पाबळ-वाफगाव-पेठ या रस्त्याच्या कामांवरील स्थगिती उठविण्यास सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे या रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लागणार आहे. त्यामुळे वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला भेट देणाऱ्या शंभुभक्तांची सोय होणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
याबाबत खासदार कोल्हे म्हणाले, ‘‘नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या कोरेगाव भीमा ते चौफुला, केंदूर पाबळ रस्त्याच्या कामासाठी विशेष लक्ष घालून पीएमआरडीएच्या निधीतून ६.५ कोटी मंजूर केले होते. तर, त्यानंतरही उर्वरित रस्त्यांच्या कामासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आग्रह धरला. त्यांनी कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक आणि चौफुला ते केंदूर, केंदूर ते पाबळ; तसेच पुणे-आळंदी-केंदूर-पाबळ-वाफगाव-पेठ अशा चार कामांसाठी एकूण ३९.२० कोटींचा कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक दरम्यानच्या कामाची निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली. त्यामुळे हे काम प्रत्यक्ष सुरूही झाले. परंतु, उर्वरित तीन कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच राज्यात सत्तांतर झाले आणि अनेक कामांवर स्थगिती आली होती. ती उठवावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. तसेच, थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानंतर तातडीने हालचाल होऊन चौफुला ते केंदूर (१० कोटी), केंदूर ते पाबळ (९ कोटी); तसेच पुणे आळंदी- केंदूर-पाबळ-वाफगाव-पेठ (८.२० कोटी) या रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती उठविण्याचा आदेश दिला.’’