दुचाकींच्या धडकेत दोन मुलांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकींच्या धडकेत
दोन मुलांचा मृत्यू
दुचाकींच्या धडकेत दोन मुलांचा मृत्यू

दुचाकींच्या धडकेत दोन मुलांचा मृत्यू

sakal_logo
By

कोरेगाव भीमा, ता. ६ : येथील वाडागाव-डिंग्रजवाडी (ता. शिरूर) रस्त्यावतील दुचाकी अपघातात १४ व १७ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला, तर एक युवक जखमी झाला. महादेव दत्तात्रेय कांबळे (वय १४, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) व सिद्धेश बाळासाहेब शिंदे (वय १७), अशी मृतांची नावे असून, ओंकार चंद्रकांत कंदारे हा युवक जखमी झाला आहे.
वाडागाव येथील वाडागाव-डिंग्रजवाडी रस्त्यावरून महादेव कांबळे व सिद्धेश शिंदे हे दोघे सोमवारी (ता. ५) सायंकाळी त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एम.एच. १२ जी.पी. २०३६) जात असताना ओंकार याच्या दुचाकीची महादेव याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. त्यात महादेव याचा जागीच मृत्यू झाला, तर सिद्धेश याचा उपचारादरम्यान पुणे येथील ससून रुग्णालयात मृत्यू झाला.
या अपघातप्रकरणी अमोल महादेव कांबळे यांनी शिक्रापूर पोलिस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी ओंकार याच्यावर गुन्हा दाखल केला.