सुपे रोड ते हाकेवस्ती रस्त्याचे काम पाडले बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुपे रोड ते हाकेवस्ती रस्त्याचे काम पाडले बंद
सुपे रोड ते हाकेवस्ती रस्त्याचे काम पाडले बंद

सुपे रोड ते हाकेवस्ती रस्त्याचे काम पाडले बंद

sakal_logo
By

केडगाव, ता. १५ ः चौफुला (ता. दौंड) येथील हाकेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांनी ते बंद पाडले.
बोरीपार्धी ग्रामपंचायत हद्दीतील सुपे रोड ते हाकेवस्ती या एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी आमदार राहुल कुल यांनी २५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. ग्रामपंचायतीने हे काम किरण मजूर संस्थेच्या नावावर दिले असले तरी प्रत्यक्षात काम माजी सरपंच करत आहे. हाकेवस्तीतील ग्रामस्थांची गेली अनेक वर्षांची या रस्त्याची मागणी होती. या हाकेवस्तीसाठी मंजूर झालेला रस्ता आपल्या वॅार्डात नेण्यासाठी ठेकेदार माजी सरपंचाने ग्रामपंचायतीमध्ये मोठा खल घातला. हाकेवस्तीतील रस्त्यासाठी माजी सरपंचांचा विरोध ग्रामस्थांनी हाणून पाडला. त्यानंतर हे काम मीच करणार असाही आग्रह त्यांनी धरला. अखेर हे काम माजी सरपंचांना देण्यात आले. मात्र काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांनी ते बंद पाडले.
रस्त्यावर आठ इंचाचा मुरूमाचा थर देण्याचे काम असताना अनेक ठिकाणी दोन ते तीन इंच मुरूम टाकला होता. ग्रामस्थांनी जाब विचारला असता इस्टिमेटप्रमाणे काम चालू असल्याचे माजी सरपंच जयदीप सोडनवर यांनी नमूद केले. या मुरूमावर पाणी न टाकताच खडीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले.
काम बंद पाडल्यानंतर अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी भेट देत ठेकेदाराला समज देत मुरूमाचा थर वाढविला, मुरूमावर पाणी मारून त्याला रोलिंग करण्यात आले. ‘‘गेल्या ३० वर्षापासून रस्त्यासाठी पाठपुरावा करत आहे. निकृष्ट काम केले तर ते पुन्हा बंद पाडून कार्यकारी अभियंता व गुणनियंत्रक विभागाकडे तक्रार केली जाईल, असा इशारा ग्रामस्थ जगन्नाथ हाके यांनी दिला आहे.’’

Web Title: Todays Latest District Marathi News Ked22b00938 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top