मारुती गॅस एजन्सीविरोधात तहसील कार्यालयात तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारुती गॅस एजन्सीविरोधात तहसील कार्यालयात तक्रार
मारुती गॅस एजन्सीविरोधात तहसील कार्यालयात तक्रार

मारुती गॅस एजन्सीविरोधात तहसील कार्यालयात तक्रार

sakal_logo
By

केडगाव, ता. २१ : सहजपूर (ता.दौंड) येथील मारुती गॅस एजन्सीकडून घरगुती गॅस वितरित करीत असताना जादा पैसे घेत टाकीचे वजन करून दिले जात नाही. याबाबत ग्राहक रमेश लडकत यांनी तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत तक्रार केली आहे.
मारुती गॅस एजन्सीकडून लडकतवाडी येथे किराणा दुकानदार गोरख होले यांच्याकडून आम्हाला गॅस वितरित केला जातो. गॅस घेताना गॅसचे वजन करून देण्याबाबत वारंवार टाळाटाळ केली जाते. याशिवाय गॅसची किंमत १००६ रुपये असताना १४ रुपये जास्तीचे पैसे घेतले जातात. तक्रार केल्यानंतर नातेवाईकांकडून माझ्यावर दबाव आणला जात आहे. हा प्रकार ग्राहकहित विरोधी असून पुरवठा शाखेने यात लक्ष घालावे.
याबाबत मारुती गॅस एजन्सीकडून सांगण्यात आले की, प्रत्येक गॅस वाहतूक करणाऱ्या टेंपोवर गॅस टाकी वजन करून घेण्याच्या सूचना लावण्यात आल्या आहेत. ऑनलाइन नोंदणी केल्यास १००६ रुपयांनाच गॅस दिला जातो. रोखीच्या व्यवहारात सुट्या पैशांमुळे पाच-दहा रुपयांचा जादा घेतले असतील तर मला सांगता येत नाही. ग्राहकांनी ऑनलाइन नोंदणी करूनच गॅस घ्यावा.

Web Title: Todays Latest District Marathi News Ked22b00970 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top