
वारकरी विठ्ठलनामाच्या जयघोषात चिंब
केडगाव, ता. २६ : ''पंढरीच्या वारीची मज आहे हौस,
विठ्ठला येऊदेरे पाऊस,
विठ्ठला तुझे नाम किती गोड,
पावसासाठी का धरलीस ओढ'' या फुलचंद नागटिळक यांच्या गीतातील भक्तीभाव मनात घेत वारकऱ्यांनी दुपारच्या विसाव्यानंतर चौफुला (ता.दौंड) येथे संत तुकाराममहाराज यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. पालखी सोहळा येथे पोहचण्या अगोदर पाऊस झाल्याने वारकरी पावसाच्या सरींबरोबर विठ्ठलाच्या जयघोषात चिंब झाले होते. चौफुला येथे सोहळा दुपारी साडे तीन वाजता विसावला.
केडगाव, वाखारी, देऊळगावगाडा, दापोडी, पारगाव, नानगाव, गलांडवाडी, पडवी येथील भाविक दर्शनासाठी आले होते. दुपारी दोन वाजता मुसळधार पावसाला सुरवात झाली. हा पाऊस ३० मिनीटे चालला. पावसात वारकरी आनंदून गेले. तर पावसामुळे वारीतील दुकानदारांची तारांबळ उडाली. खुटबाव येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सोहळा समोर रांगोळीच्या पायघड्या घातल्या. आमदार राहुल कुल व बोरीपार्धी ग्रामपंचायतीने पालखी सोहळा व भाविकांचे स्वागत केले.
अंबिका कला केंद्राचे प्रमुख डॅा. अशोक जाधव यांनी वारक-यांना जेवण देत त्यांचे मनोरंजन केले. सुभाष कुल महाविद्यालयाने वारकऱ्यांना लापशीचे जेवण दिले.
भांडगाव ग्रामस्थांकडून दुपारची न्याहरी घेऊन पालखी सोहळा दुपारी एकच्या सुमारास मार्गस्थ झाला. चौफुला येथे बोरीपार्धीचे सरपंच सुनील सोडनवर, उपसरपंच ज्योति मगर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुल, दौंड पंचायत समितीच्या माजी सभापती मीना धायगुडे, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव ताकवणे यांनी महामार्गावर स्वागत केले.चौफुला येथील ग्रामस्थांनी गुढ्या उभारून वारक-यांचे स्वागत केले. पाऊसाने उघडीप दिल्यानंतर महामार्गावर वारकऱ्यांनी विविध खेळ खेळत आनंद द्विगुणित केला.
01835
Web Title: Todays Latest District Marathi News Ked22b00978 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..