कुल यांच्या मंत्रीपदाकडे दौंडवासियांचे डोळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुल यांच्या मंत्रीपदाकडे दौंडवासियांचे डोळे
कुल यांच्या मंत्रीपदाकडे दौंडवासियांचे डोळे

कुल यांच्या मंत्रीपदाकडे दौंडवासियांचे डोळे

sakal_logo
By

केडगाव, ता. ३ ः दौंड विधानसभेचे भाजप आमदार राहुल कुल यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी आशा त्यांचे समर्थक बाळगून आहेत. यानिमित्ताने तालुक्याला पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भाजपचे एकमेव आमदार हा मुद्दा राहुल कुल यांच्याबाबतीत महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत हायकमांडने अखेरच्या क्षणी जसे धक्कातंत्र वापरले, तसे काहीही घडू शकते याची जाणीव समर्थकांना आहे. पुणे जिल्हाच्या ग्रामीण भागात भाजपला बळ द्यायचे असेल तर कुल यांचा पर्याय भाजप पक्ष नेतृत्वापुढे आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, आंबेगाव, पिंपरी, इंदापूर, शिरूर, भोर, पुरंदर, मावळ या तालुक्यांना आजवर मंत्रिपदाची संधी मिळाली आहे, मात्र दौंड तालुका उपेक्षित राहिला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल कुल यांना मंत्री करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द फडणवीस पाळणार का, याची उत्सुकताही दौंडवासियांत आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ked22b00984 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top