
मद्यार्काची तस्करी करताना एकास अटक
केडगाव, ता. २८ : पारगाव (ता.दौंड) येथे अतिशुद्ध मद्यार्काची तस्करी करताना राज्य उत्पादक शुल्कच्या भरारी पथकाने एकास अटक केली आहे. सुरिंदरसिंग मेला (वय ४७, रा. केआमपूर, जि. अमृतसर ) असे त्याचे नाव आहे. यावेळी पथकाने ५३ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पारगाव - चौफुला रस्त्यावरील यशदीप पेट्रोलपंपाच्या शेजारील राजस्थान हॅाटेलच्या बाजूला ही तस्करी सुरू होती. उत्पादन शुल्कच्या पथक क्रमांक दोनला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांना छापा टाकून ही कारवाई केली आहे. यावेळी टँकरमधून मद्यार्क पाइपने प्लॅस्टीकच्या बॅरलमध्ये भरत असताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तीस लाख रुपयांच्या १६ चाकी टँकरसह टँकरमधील ३९ हजार २०० लिटर अतिशुद्ध मद्यार्क, दोनशे लिटरचे चार भरलेले बॅरल असा एकूण ५३ लाख ९४ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सुरिंदरसिंग याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्पादक शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तानाजी शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली.
----
01878
Web Title: Todays Latest District Marathi News Ked22b01002 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..