पाटसकर यांचे कुटुंब बेघरच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटसकर यांचे कुटुंब बेघरच!
पाटसकर यांचे कुटुंब बेघरच!

पाटसकर यांचे कुटुंब बेघरच!

sakal_logo
By

केडगाव, ता. १४ : स्वातंत्र्यसैनिक व दौंडचे माजी आमदार जगन्नाथ पाटसकर यांच्या घराचा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देऊनही वर्षभर सुटलेला नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाअखेर तरी आम्हाला घरासाठी जागा मिळेल का, याकडे पाटसकर कुटुंबीय डोळे लावून बसले होते. परंतु, महसूल विभागातील लालफितीचा कारभार आणि राजकीय उदासीनतेमुळे त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरू शकले नाही.
पाटसकर यांच्या कुटुंबीयांना द्यावयाच्या जागेच्या प्रस्तावात काही गोष्टी स्पष्ट होत नव्हत्या. त्यामुळे हा प्रस्ताव मंत्रालयातून दोन महिन्यांपूर्वी दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे आला. हा प्रस्ताव अनेक दिवस दौंड तहसीलमध्ये धूळ खात पडला होता. ‘सकाळ’चे प्रस्तुत प्रतिनिधी व पाटसकर कुटुंबीयांनी अनेकदा हेलपाटे मारल्यानंतर दोन दिवसांपूर्वी हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.
अजित पवार यांनी २३ जुलै २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत एक महिन्यात जागेचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. सुरवातीला या कामाला गती होती, मात्र नंतर काम मंदावले. पवार यांनी सूचना देऊन एक वर्ष होऊन गेले तरी या कामात ठोस प्रगती अजूनही दिसत नाही. भूमी अभिलेख व नगरविकास विभागाने मात्र त्यांच्याकडील काम वेगात पूर्ण केले आहे. महसूल विभागाकडील फाइल कासवगतीने पुढे सरकत आहे. याबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ked22b01023 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..