केडगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी संपावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी संपावर
केडगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी संपावर

केडगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी संपावर

sakal_logo
By

केडगाव, ता. ३ ः सुमारे एक कोटी रुपयांची कर आकारणी असलेल्या केडगाव ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा कर्मचारी काल एक दिवसाच्या संपावर गेल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. पाणी न आल्याने काल बराच गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांना दया आल्याने त्यांनी आज पाणी सोडले.
सुमारे तीस हजार लोकसंख्या असलेले केडगाव दौंड तालुक्यातील मोठी बाजारपेठ समजली जाते. ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व आहे. पदाधिकारी भरपूर परंतु नागरिकांना सुविधा देण्याबाबत त्यांच्यात एकवाक्यता नाही. ग्रामपंचायत प्रशासनावर ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. येथील सरपंच अजितकुमार शेलार हे जनतेतून निवडून आले आहेत. ग्रामपंचायतीत पाच पाणीपुरवठा कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना गेली चार महिने पगार नाहीत. इतर १४ कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार होत आहेत. प्रशासन पगाराबाबत दुजाभाव करीत असल्याच्या तक्रारी आहेत. कर संकलन वेळेत होत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनापुढे समस्या आहे. त्यामुळे प्रशासन पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना ''पट्टी वसुल करा आणि तुमचा पगार घ्या.'' असे म्हणत आहे. ग्रामपंचायतीने थकबाकीदारांची यादी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांकडे दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हतबल होत काल संपाचे हत्यार उपसले. पगार लवकर झाला नाही तर पुन्हा संपावर जाण्याच्या विचारात कर्मचारी आहेत.
याबाबत ग्रामपंचायत सदस्य नितीन कुतवळ म्हणाले, ‘‘केडगाव स्टेशन वॅार्डात नागरिकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. येथील रहिवासी हे व्यापारी व सुशिक्षित असल्याने ते नियमित कर देतात मात्र स्टेशनच्या नागिरकांना प्रत्येक सुविधा मिळवताना संघर्ष करावा लागतो. गेल्या चार वर्षात जनरल फंडातून एकही ठोस काम झालेले नाही. पाणी टंचाईला ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे.''''
ग्रामपंचायत कर्मचारी म्हणाले, ''''आम्ही पाणीपुरवठा पाहायचा की वसुली करायची हा आमच्यापुढे प्रश्न आहे. पाणी पुरवठ्यासाठी रात्रंदिवस काम करावे लागते. महागाई आणि सणासुदीचे दिवस असूनसुद्धा आम्हाला मे महिन्यापासून पगार नाही.''''
सरपंच अजित शेलार म्हणाले, ''''घरपट्टी, पाणीपट्टी वसूल समाधानकारक नाही. गावात सर्व्हे चालू असून बोगस पाणी पुरवठा कनेक्शन कट करण्यात येत आहेत. वसुली चालू असून सोमवारी (ता. ५) पगार होतील. नागरिकांनी करवसुलीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे.''''

Web Title: Todays Latest District Marathi News Ked22b01039 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..