बोरीपार्धी नगरपंचायतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरीपार्धी नगरपंचायतीसाठी
जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव
बोरीपार्धी नगरपंचायतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

बोरीपार्धी नगरपंचायतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

sakal_logo
By

केडगाव, ता. १५ : बोरीपार्धी (ता. दौंड) ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करावे, अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केल्याची माहिती सरपंच सुनील सोडनवर यांनी दिली.
याबाबत ‘सकाळ’ने सविस्तर वृत्त दिले होते. त्यानंतर विशेष ग्रामसभा घेण्यात आली. त्यात ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला. बोरीपार्धीचे सर्वेसर्वा आनंद थोरात व नगररचनाकार दत्तात्रेय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. नगरपंचायतची मागणी करणारी बोरीपार्धी हे तालुक्यातील पहिले गाव आहे.
सरपंच सोडनवर यांनी प्रस्तावात म्हटले की, गावात बोरीपार्धी व धायगुडेवाडी, अशी दोन महसूली गावे आहेत. गावामध्ये निवासी स्वरूपाचे सात मजली बांधकामे झालेली आहेत. गावची सध्याची लोकसंख्या २५ ते ३० हजार एवढी आहे. पुणे जिल्हा व दौंड तालुक्यातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ म्हणून बोरीपार्धीचा लौकिक आहे. गावामध्ये दुय्यम निबंधक कार्यालय, अॅटो हब, कंपनी, खरेदी विक्री संघ, माध्यमिक विद्यालये असून दैनंदिन कामासाठी १० ते १५ गावे बोरीपार्धीच्या बाजारपेठेवर अवलंबून आहे. त्यामुळे येथे लोकांची वर्दळ नेहमी असते. गावात पंडिता रमाबाई मुक्ती मिशन ही अनाथांची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. गावातून रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. येथे दवाखाने, पतसंस्था, आठवडा बाजार आहे. बोरीपार्धीचे नागरिकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने गावाला सुविधा पुरविताना मर्यादा येत आहेत. विकासनिधीही कमी पडत आहे. सर्व नागरिकांना आवश्यक त्या नागरी सुविधा पुरविण्यासाठी तसेच गावचा विकास करण्यासाठी बोरीपार्धी येथील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करावे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ked22b01049 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..