गुऱ्हाळात प्लास्टिक जाळणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुऱ्हाळात प्लास्टिक जाळणार नाही
गुऱ्हाळात प्लास्टिक जाळणार नाही

गुऱ्हाळात प्लास्टिक जाळणार नाही

sakal_logo
By

केडगाव, ता. १९ : गुळात भेसळ करणार नाही आणि इंधन म्हणून प्लास्टिक कचरा जाळणार नाही, अशी ग्वाही गुऱ्हाळ मालकांनी पारगाव (ता. दौंड) येथे आंदोलनकर्त्यांना दिली.
पारगाव येथे एकाच गावात ४० गुऱ्हाळे आहेत. त्यातील बहुतांश गुऱ्हाळे ही परप्रांतीयांची आहेत. प्रत्येक गुऱ्हाळघरात २५ ते ३० मजूर काम करत आहे. पारगावचे अर्थकारण या गुऱ्हाळांवर अवलंबून आहे. त्यातील काही गुऱ्हाळांमध्ये गुळात भेसळ व प्लास्टिक इंधन म्हणून जाळत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या विरोधात संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचे हत्यार उपसले होते. संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्याने गुऱ्हाळ मालक व चालक यांचे धाबे दणाणले. त्यामुळे त्यांनी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात याची भेट घेऊन परिस्थिती सांगितली. संभाजी ब्रिगेडने यात थेट पारगाव ग्रामपंचायतीला आव्हान दिले. त्यामुळे सरपंच जयश्री ताकवणे यांनी गुऱ्हाळावर प्लास्टिक कचरा सापडल्यास १० हजार रुपयांचा दंड आकारला.
या सर्व प्रकरणावर चर्चा करण्यासाठी पारगाव येथे गुऱ्हाळ मालक व आंदोलनकर्ते यांच्यात रविवारी (ता. १८) बैठक घेण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांच्यावतीने माजी उपसरपंच संभाजी ताकवणे म्हणाले, ‘‘प्रदूषणामुळे येथे फळभाजीपाला येत नाही. गुऱ्हाळघरांना आमचा विरोध नाही. परंतु, गुळात भेसळ आणि प्रदूषण थांबले; तर आमची काहीच हरकत नाही.’’
या दोन्ही मुद्यांवर सर्वच गुऱ्हाळ चालक व मालकांचे एकमत झाले. गुऱ्हाळ मालकांच्यावतीने दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती सयाजी ताकवणे आणि माजी उपसरपंच सोमनाथ ताकवणे म्हणाले, ‘‘पारगावच्या विकासात गुऱ्हाळ घरांचा मोठा वाटा आहे. गुऱ्हाळ नसती तर ऊस उत्पादकांचे हाल झाले असते. त्यामुळे ती बंद करून चालणार नाही. गुऱ्हाळ घर उभे करताना त्यात शेतकऱ्याची मोठी गुंतवणूक झालेली आहे. भेसळ आणि प्रदूषण या दोन्ही गोष्टींच्या विरोधात आम्ही आहोत. गुऱ्हाळ घरातील अनिष्ट प्रथांचा सर्वांना त्रास होत आहे, हे आम्हाला मान्य आहे. भेसळ व प्रदूषण यापुढे होणार नाहीत.’’
यावेळी सुभाष बोत्रे, सुरेश ताकवणे, लक्ष्मण ताकवणे, नानासाहेब जेधे, श्याम ताकवणे, रामकृष्ण ताकवणे, विजय चव्हाण,एकनाथ शेळके,नामदेव काळे,धनाजी ताकवणे, संभाजी ब्रिगेडचे स्वरूप ताकवणे, ज्ञानेश्वर भोगावडे, विकास ताकवले, गणेश ताकवणे, वैभव बोत्रे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Ked22b01054 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..