केडगाव ः तुकाईदेवी, रासाईदेवी, पद्मावतीदेवी, शितळादेवी मंदिरात घटस्थापना परिसरात नवरात्र उत्सवाला सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडगाव ः तुकाईदेवी, रासाईदेवी, पद्मावतीदेवी, शितळादेवी मंदिरात घटस्थापना 
परिसरात नवरात्र उत्सवाला सुरवात
केडगाव ः तुकाईदेवी, रासाईदेवी, पद्मावतीदेवी, शितळादेवी मंदिरात घटस्थापना परिसरात नवरात्र उत्सवाला सुरवात

केडगाव ः तुकाईदेवी, रासाईदेवी, पद्मावतीदेवी, शितळादेवी मंदिरात घटस्थापना परिसरात नवरात्र उत्सवाला सुरवात

sakal_logo
By

केडगाव, ता. २९ ः केडगाव (ता. दौंड) परिसरात नवरात्र उत्सवाला सुरवात झाली. कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर आलेला उत्सव व समाधानकारक झालेला पाऊस यामुळे भाविकांच्या उत्साहात भर पडली आहे.
पारगाव येथील ग्रामदैवत तुकाईदेवी मंदिरात परंपरेप्रमाणे पोलिस पाटील उद्धव ताकवणे यांच्या हस्ते घटस्थापना झाली. देवीच्या दागिन्यांचा मान दगडोबा बोत्रे यांना देण्यात आला. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच, तिसऱ्या माळेपासून येथे ढोल लेझीमचे डाव सुरू झाले आहेत.

त्याचबरोबर नानगाव येथील ग्रामदैवत रासाईदेवी मंदिरात देखील नवरात्रीला प्रारंभ झाला. नवरात्रनिमित्त आरती, छबिना, गोंधळ, भजन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पाचव्या व सातव्या माळेला बाहेरगावी असलेली ग्रामस्थ मंडळी दर्शनासाठी गावात येत असतात. या वेळी देवीच्या मूर्तीला वज्रलेप केल्याने मुर्ती आकर्षक दिसत आहे.

केडगावच्या पद्मावती देवीच्या मंदिरात साध्या पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. महालक्ष्मी मंदिरासमोर आकर्षक कमानींची सजावट केली आहे. विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला आहे. राजेंद्र लवंगरे व सुधाकर भांबुर्डेकर यांच्या हस्ते घटस्थापना झाली. हनुमान तरुण मंडळ येथील व्यवस्था पाहत आहे.

चौफुला येथील शितळादेवी मंदिरात ज्येष्ठ व्यावसायिक वामन येडे यांच्या हस्ते घटस्थापना झाली. बेटी बचाव बेटी पढाव असा संदेश येथे देण्यात आला आहे. कीर्तन, भारूड, देवीची गाणी, भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शितळादेवी तरुण मंडळ नियोजन करत आहे.