भीमा साखर कारखान्यात रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीमा साखर कारखान्यात रक्तदान शिबिर
भीमा साखर कारखान्यात रक्तदान शिबिर

भीमा साखर कारखान्यात रक्तदान शिबिर

sakal_logo
By

केडगाव, ता. १६ : भीमा पाटस साखर कारखाना येथे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव शितोळे यांच्या २९ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ४५ कामगारांनी रक्तदान केले.

कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांच्या हस्ते शितोळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. दौंड येथील रोटरी क्लब व भीमा कामगार संघाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील, माजी उपाध्यक्ष सत्वशील शितोळे, संचालक नामदेव शितोळे, तुकाराम ताकवणे, विकास शेलार, एम.डी.फरगडे, चंद्रकांत नातू, कामगार संघाचे अध्यक्ष अर्जुन दिवेकर आदी उपस्थित होते.

मधुकाका शितोळे यांच्याकडे दूरदृष्टी व जिद्द होती. त्यांनी ४२ वर्षापूर्वी अतिशय खडतर परिस्थितीत कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. काल गव्हाण पूजन झाले असले तरी आज खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मृतीदिनाला कारखाना चालू होत आहे हा योगायोग आहे.
- राहुल कुल, आमदार

पाटस (ता. दौंड) : मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना मान्यवर.