रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाची मागणी
रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाची मागणी

रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाची मागणी

sakal_logo
By

केडगाव, ता. २६ : कानगाव व कडेठाण (ता. दौंड) येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली.
याबाबत कुल म्हणाले, ‘‘सध्या याठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्यात सतत पाणी साचत आहे. त्यामुळे येथे उड्डाणपूल बांधणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या सुवर्ण चतुर्भुज योजनेअंतर्गत राज्य सरकारने सर्व मानवयुक्त रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेचे भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल बांधण्यासाठी आधीच संमती दिली आहे. या योजनेअंतर्गत कडेठाण व कानगाव येथील रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेचे भुयारी मार्गाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. परंतु, या ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आणि नजीक असलेली कालवातील पाणी वितरण चारीमुळे या भुयारी मार्गात सतत पाणी साचते व ते बाहेर पडू शकत नाही. विशेषतः पावसाळ्यात अपाणी साचल्याने बराच काळ हा भुयारी मार्ग बंद असतो. गेले २ वर्ष होऊन ही उर्वरित काम पूर्ण झालेले नाही. तेव्हा कडेठाण व पाटस रेल्वे स्थानक येथे रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारावा.