पत्रकार हत्येचा
दौंडमध्ये निषेध

पत्रकार हत्येचा दौंडमध्ये निषेध

केडगाव, ता. १० : राजापूर (जि. रत्नागिरी) येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांची हत्या झाल्याच्या निषेधार्थ दौंड तालुक्यातील पत्रकारांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. मराठी पत्रकार परिषदेचे राज्य विश्वस्त एस. एम. देशमुख व राज्याचे अध्यक्ष शरद पाबळे, जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध व्यक्त करण्यात आला.
तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, यवत पोलिस निरीक्षक यांना आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र खोरकर, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार, उपाध्यक्ष राजू जगदाळे आदी पत्रकार उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की, पत्रकार संरक्षण कायद्याखाली संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत. व हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com