''भीमा पाटस''कडून खंडोबा चरणी साखर पोते अर्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''भीमा पाटस''कडून खंडोबा चरणी साखर पोते अर्पण
''भीमा पाटस''कडून खंडोबा चरणी साखर पोते अर्पण

''भीमा पाटस''कडून खंडोबा चरणी साखर पोते अर्पण

sakal_logo
By

केडगाव, ता. १५ : निराणी ग्रुप संचलित भीमा पाटस कारखान्याचे दोन लाख टन गाळप पूर्ण झाले आहे. यामुळे कारखान्याचे कार्यकारी संचालक रविराज पाटील यांनी प्रतिजेजुरी देलवडी (ता. दौंड) येथील खंडोबा चरणी एक साखर पोते अर्पण केले.
तीन गळीत हंगामानंतर दोन महिन्यापूर्वी कारखाना सुरू झाला. पहिले साखरेचे पोते पाटस येथील ग्रामदैवत नागेश्वर देवाला अर्पण करण्यात आले होते. त्यानंतर दोन लाख गाळप झाल्यानंतर देलवडीच्या खंडोबाला साखर पोते अर्पण करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे अधिकारी शरयू शिरशी, भीमा पाटस कारखान्याचे संचालक तुकाराम ताकवणे व विकास शेलार, डी. आर. शेलार, दत्तात्रेय शेलार, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक रविराज पाटील म्हणाले की, तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कारखाना उशिरा सुरू होऊनही चांगला चालला आहे. आमदार राहुल कुल व संगमेश निराणी यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार वर्ग, सभासद, प्रशासन यांच्या नियोजनाखाली गाळप चालू आहे. आगामी ८ दिवसांमध्ये यंत्रणा वाढवून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ऊस तोडणी करण्याचा आमचा मानस आहे.
भीमा पाटसचे संचालक विकास शेलार म्हणाले की, कारखान्याचे आसवनी व सहवीजनिर्मिती चालू असून प्रत्येक आठवड्याला तोडणी वाहतूक व ऊस उत्पादकांचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा होत आहेत. अनेक कामे ऑनलाइन करण्याचा प्रयत्न चालू आहे. अध्यक्ष राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी गाळप हंगाम हा गेल्या अनेक वर्षातील मोठा गाळप हंगाम होणार आहे.
---
02341