Sun, May 28, 2023

बोरीपार्धी येथे महिलांना प्रशिक्षण
बोरीपार्धी येथे महिलांना प्रशिक्षण
Published on : 20 February 2023, 2:03 am
केडगाव, ता. २० ः बोरीपार्धी (ता.दौंड) येथील महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना बेसिक संगणक प्रशिक्षण व ज्यूट बॅग प्रशिक्षण देण्यात आले. बोरीपार्धी ग्रामपंचायत व सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान हडपसर यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी सरपंच सुनील सोडनवर, उपसरपंच ज्योती मगर, बाळासाहेब सोडनवर, शेखर सोडनवर, ग्रामविकास अधिकारी सयाजी क्षीरसागर, आप्पासाहेब ताडगे व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या कार्यक्रमाधिकारी सारिका कुंभार यांनी संस्थेच्या माध्यमातून गेली २२ वर्षात ब्युटी पार्लर, संगणक, मसाले, केक, दुग्ध, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू आदी बाबींचे प्रशिक्षण दिल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे प्रशिक्षक सूर्यकांत माडे यांनी केले. तर रामचंद्र कुंभार यांनी आभार मानले.