पारगावात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारगावात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
पारगावात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

पारगावात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

sakal_logo
By

केडगाव, ता. २० : पारगाव (ता. दौंड) येथे शिवजयंतीनिमित्त पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ग्रामस्थांनी अनुभवली. यावेळी काढलेल्या मिरवणुकीत सुमारे ६०० महिलांनी सहभाग नोंदविला.

पारगाव परिसरातील नानगाव, रांजणगाव, नागरगाव, मांडवगण व न्हावरे परिसरातील जवळपास तीन हजार शिवभक्तांनी येथे उपस्थिती लावली. ट्रकच्या ट्रेलरवर शिवजयंतीची सजावट केली होती. चित्तथरारक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे शिवकालीन मर्दानी खेळ, पारंपरिक ढोल लेझीम आणि हलगीचा डाव, भजनी मंडळ, विद्याताई जगताप महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलांनी हरिनामाच्या जयघोषावर ठेका धरल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. रात्री दहा वाजता उपस्थित महिलांच्या हस्ते पाळणा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने सहभागी प्रत्येक महिलेला भगवा फेटा बांधला. सिंहगडावरून आणलेल्या शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तर सांयकाळी पारगावच्या मुख्य चौकाचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले. यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून शाही मिरवणुकीला सुरुवात झाली.


02353