दौंड केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी दिगंबर खराडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड केमिस्ट असोसिएशनच्या 
अध्यक्षपदी दिगंबर खराडे
दौंड केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी दिगंबर खराडे

दौंड केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी दिगंबर खराडे

sakal_logo
By

केडगाव, ता. १७ : दौंड तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी दिगंबर खराडे (नानगाव) यांची; तर उपाध्यक्षपदी राहुल भंडारी (दौंड) यांची बिनविरोध निवड झाली.
पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनची नुकतीच चौफुला (ता. दौंड) येथे बैठक झाली. तीत या निवडी करण्यात आल्या. यावेळी अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, पश्चिम क्षेत्राचे सहसचिव दत्तप्रसाद टोपे, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल बेलकर, उपाध्यक्ष रामचंद्र गायकवाड, जनसंपर्क अधिकारी रोहित जोशी, शशिकांत डांगी, रोहिदास राजपुरे, सुभाष झावरे, अजित पितळे, काका जगताप आदी उपस्थित होते.
या बैठकीत निवड झालेले इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे- वरिष्ठ उपाध्यक्ष- विशाल शेळके, दादा लोणकर, अंकुश मोरे, सचिव- सचिन हेंद्रे, सतीश काटकर, खजिनदार सुहास शितोळे, सहसचिव राजेंद्र वाघोले, प्रवीण काळे, संघटक सचिव- रोहन कुंजीर, अक्षय पितळे, कार्यकारिणी सदस्य- सौरभ दिवेकर, जगदीश महानोर,
भिवाजी शेंडगे, रामदास शेलार, विशाल ताकवले, संदीप पोळ, नीलेश ननवरे, तानाजी नांगरे, सुधीर कदम.