दौंड, हवेलीतील महसूल प्रश्‍नांसंदर्भात बैठक

दौंड, हवेलीतील महसूल प्रश्‍नांसंदर्भात बैठक

केडगाव, ता. २४ : दौंड तालुका स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्याबाबत हरकती व सूचना मागविण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळावी, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.
दौंड व हवेली तालुक्यातील महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्नांसंदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये आमदार राहुल कुल यांनी महसूल विभागाशी संबंधित विविध मागण्या केल्या. त्यावर मंत्री व अधिकारी यांच्यात चर्चा झाली. या बैठकीस मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, सहसचिव रमेश चव्हाण, श्रीराम यादव, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे, प्रांताधिकारी संजय आसवले, प्रांताधिकारी दौंड-पुरंदर मिनाज मुल्ला, दौंडचे तहसीलदार संजय पाटील, हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद, संचालक रोहीदास उंद्रे, गणेश घुले, सुदर्शन चौधरी, स्वप्नील उंद्रे, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव ताकवणे, शाहू भोसले आदी उपस्थित होते.
कुल यांनी उजनी धरणाच्या संपादित क्षेत्रात येणाऱ्या खानोटा गावाचे अंशतः पुनर्वसन झाले असून, उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील ओलाव्यामुळे बाधित घरांचे संपादन व पुनर्वसन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी केली. याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी (पुणे) यांनी प्रांत व तहसीलदार यांच्या समवेत बैठक घेऊन स्थळ पाहणी करून आवश्यक त्या जागेचे प्रस्ताव पाठवावेत व पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश दिले.
भामा आसखेड धरणाच्या लाभक्षेत्रातून वगळलेल्या, परंतु पुनर्वसनासाठी राखीव केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील ‘राखीव’ हा शेरा काढण्यासाठी तातडीने कार्यवाही करून बाधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे अंतर्गत येणाऱ्या खेड शिवापूर बाजार समिती आवार, मांजरी उपबाजार समिती पार्किंग, तसेच पेरणे उपबाजार आवाराकरिता महसूल विभागाची जागा मिळावी, अशी मागणी केली. त्यानुसार उपलब्ध असलेल्या जागांचे परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करावेत, अशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com