ओढे, पाणथळांच्या पुनरुज्जीवनाची गरज

ओढे, पाणथळांच्या पुनरुज्जीवनाची गरज

केडगाव, ता. २५ : ''पाझरपड जमिनी पुन्हा लागवडीखाली आणायच्या असतील जुन्या काळातील ओढे, नाले, डोह, पाणथळ आदींचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे. ते नाहीसे झाल्याने पाझरपडीचे क्षेत्र वाढत आहे. जिथे पाणी नाही तेथे पाणी अडविले पाहिजे तर जिथे जास्त पाणी आहे तिथे पाणी काढून दिले पाहिजे,'' असे मत जलतज्ज्ञ डॅा. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
पारगाव (ता.दौंड) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सरदार यांच्या नवनिर्माण न्यास संस्थेत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. दौंड व शिरूर तालुक्यातील पाझरपड जमिनींची पाहणी करण्यासाठी ते आले होते. या समस्येवरील कारणे व उपाय यावर यावेळी चर्चा झाली. पर्जन्यमानानुसार पीक पद्धती बदलली पाहिजेत यावरही चर्चासत्रात भर देण्यात आला.

यावेळी ''यशदा''चे संचालक हरिहर कौसडीकर, यशदाचे निवृत्त अधिकारी सुमंत पांडे, दौंडचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, शिरूरचे गटविकास अधिकारी अजित देसाई, वसुधा सरदार, सरपंच जयश्री ताकवणे, डॅा. यशवंत खताळ, तुकाराम ताकवणे, मच्छिंद्र ताकवणे, कैलास ताकवणे, आत्माचे कृषी अधिकारी महेश रूपनवर, सदाशिव रणदिवे, मानवलोक संस्थेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

राजेंद्रसिंह म्हणाले, की उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांनी जमीन व पाणी स्त्रोतांची रचना बदलून टाकली आहे. त्याचे दुष्परिणाम शेतकरी भोगत आहे. जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांनी ओढे, नाले, डोह सपाट करून टाकले आहेत. हे सर्व बदलायचे असेल तर लोकसहभागातून जैवविविधतेवर भर दिला पाहिजे. शेतात हिरवळीचे पिके घेतली पाहिजेत. सरकार व एनजीओ यांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. पिकांना मोठ्या प्रमाणात रासायनिक खते वापरणार असू तर नद्या प्रदूषित होतील. त्यासाठी सेंद्रिय शेतीचा विचार शेतक-यांनी केला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com