सराफवाडी येथील कुदळे यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराफवाडी येथील कुदळे यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
सराफवाडी येथील कुदळे यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

सराफवाडी येथील कुदळे यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

sakal_logo
By

निमगाव केतकी, ता.१२ : सराफवाडी (ता.इंदापूर) येथील युवा शेतकरी संतोष दशरथ कुदळे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांनी कोविड काळात पिकेल ते विकेल या योजनेअंतर्गत शेतकरी ते ग्राहक शेती मालाची विक्री उभी करून, उल्लेखनीय कार्यकेल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
समारंभात कुदळे यांचा हस्ते शाल, श्रीफळ, आंब्याचे रोप, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माळेगाव (ता.बारामती) येथील शरद सभागृहात शनिवारी (ता.७ ) महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकरी शंभर टन ऊस अभियान प्रारंभ व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.
या वेळी जिल्हा कृषी अधिक्षक ज्ञानेश्वर बोटे, राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ धर्मेश फाळके, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, इंदापूर तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांच्यासह साखर कारखान्यांचे अध्यक्ष उपस्थित होते. बारामती तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी आभार मानले.

01129

Web Title: Todays Latest District Marathi News Ket22b00773 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top