गातोंडीत लांडग्यांच्या हल्ल्यात सात करडांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गातोंडीत लांडग्यांच्या हल्ल्यात सात करडांचा मृत्यू
गातोंडीत लांडग्यांच्या हल्ल्यात सात करडांचा मृत्यू

गातोंडीत लांडग्यांच्या हल्ल्यात सात करडांचा मृत्यू

sakal_logo
By

निमगाव केतकी, ता. २६ : गोतोंडी (ता. इंदापूर) येथील गावठाणात गुरुवारी (ता. २६) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका लांडग्याने शेळ्यांच्या गोट्यात हल्ला केला. या हल्ल्यात ३ ते ४ महिन्याचे ४ बोकड व ३ शेळ्या असे ७ करडे मृत्युमुखी पडले. तर एक गंभीर जखमी झाले. अचानक दुपारी लांडग्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोतोंडी गावठाणातील अनिल बिबे यांच्या घराजवळ असलेल्या गोट्यात ही घटना घडली. घटना समजताच गावचे सरपंच गुरुनाथ नलवडे व सदस्य किशोर कांबळे यांनी घटनास्थळी भेट देवून वन विभाग व पशुवैद्यकीय डॉक्टर यांना घटनेची कल्पना दिली. पशुवैद्यकीय डॉ. साहेबराव शेगर यांनी तपासणी केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Ket22b00782 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top