
निमगाव केतकी येथे कडकडीत बंद
निमगाव केतकी, ता.१० ः भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला गावकऱ्यांसह व्यापारी वर्गाने शंभर टक्के प्रतिसाद दिला.
शुक्रवारी सकाळी मुस्लिम समाज बांधव गावातील मक्का मज्जिद येथे एकत्रित आले. हाताला काळ्या फिती बांधून हा मूक मोर्चा बाजारतळ, ग्रामपंचायत कार्यालयासमोरून बसस्थानकाजवळ पोचला. याठिकाणी नूपुर शर्मा यांचे पोस्टर जाळण्यात आले. पुढे हा मोर्चा संत तुकाराम महाराज पालखी विसावा चौकापर्यंत जाऊन तेथून परत पोलिस मदत केंद्राजवळ पोहोचला. या ठिकाणी पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
दरम्यान, गावातील सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवून या बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शविला.
Web Title: Todays Latest District Marathi News Ket22b00792 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..