
टोमॅटोच्या पिकातून कमविले तीन लाख
निमगाव केतकी, ता.२१ : उन्हाळी वाणाची निवड... योग्य व्यवस्थापन... पाण्याचे सुक्ष्म नियोजन... अन् अन्नद्रव्याची योग्य उपलब्धता याच्या जोरावर वरकुटे खुर्द (ता.इंदापूर) येथील डॉ. तेजस अर्जुन भोंग यांनी मार्चमध्ये सव्वा एकर क्षेत्रात टोमॅटो पिकाचे यशस्वी भरघोस उत्पादन घेतले आहे. त्यांनी केवळ तीन आठवड्यात तीनशे क्रेट उत्पादनातून सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
डॉ. भोंग यांनी रुग्णाची सेवा करत असतानाच वडिलोपार्जित काळ्या आईची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी मार्चमध्ये २१ मार्चला सेमीनीस कंपनीची अर्थव या वाणाची आठ बाय सव्वा फुटावर ८५०० रोपांची लागवड केली. मशागत, रोपे, मल्चिंग, ठिबक, खते, औषधे, स्टेजींग, खुरपणी यासाठी एक लाखा पेक्षा जास्त खर्च झाला.
आता टोमॅटोच्या पिकास प्रति किलो पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहे.
टोमॅटोचा ६५ दिवसानंतर एक जूनला पहिला तोडा झाला.पहिल्या दोन तोड्या नंतर प्रती तोडा सरासरी शंभर क्रेट माल निघत आहे. पाचव्या दिवशी तोडा होत आहे.
यामुळे बहरले टोमॅटोचे पीक
१. चार ट्रेलर शेणखत, बेसलडोस देऊन मशागत
२. बेडला ठिबकच्या एक ऐवजी दोन लाईन टाकल्या
३. शांतीलेक्स कंपणीचा उच्च दर्जाचा मल्चिंग पेपर
४. चार इंचचे होल पाडल्याने रोपे जळाली नाहीत
५. चार वेळा बेड ओला करूनच पिकाची लागवड केली
६. तापमान नियंत्रणात राहिल्याने रोपांची वाढ चांगली
असे केले ताण व्यवस्थापन
सर्वात जास्त लक्ष ताण व्यवस्थापनावर दिले. सुरुवातीला रोपे आणल्यापासून सिलीकॉचा स्प्रे दिला. लागवडी नंतर सिलिकॉनची आळवणी केली. दुसऱ्या आळवणीत कॕलशियम नायट्रेड व अॕमीनो ॲसिड चा वापर केला. रोपे स्थिरावल्यानंतर ह्युमिक ॲसिड वापरले. यामुळे प्रचंड उष्णता असूनही रोपांची वाढ जोमाने झाली.
असे केले कीड व्यवस्थापन
रासायनिक व भौतिक व्यवस्थापना मध्ये चिकट सापळे, टुट आळीचा सापळा, पतंगाचा सापळा, फळमाशीचा सापळा लावल्याने कमी खर्चात कीडीवर प्रचंड नियंत्रण आले. रासायनिक व्यवस्थापनात आळी या महत्त्वाच्या घटकांवरही नियंत्रण केले.झा डे सशक्त असल्याने पिवळ्या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला नाही.
रंग आकर्षक रंगाच्या टोमॅटोला दरही चांगला मिळत आहे. २२ किलो क्रेटला एक हजार रुपये एवढा चांगला दर मिळत आहे. तीन आठवड्यात तीनशे क्रेटचे तीन लाख रुपये मिळाले आहे. फड संपेपर्यंत दीड हजार क्रेटचे उत्पादन निघेल.
- डॉ. तेजस भोंग, टोमॅटो उत्पादक
01177
Web Title: Todays Latest District Marathi News Ket22b00799 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..