
निमगावात १७१ व्या दिवसांचे आंदोलन मागे
निमगाव केतकी, ता.११ः येथून (ता.इंदापूर) जाणारा संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग गावातून जाणार नसल्याचे राजपत्रात प्रसिद्ध होताच दुकानदार व्यापाऱ्यांनी सोमवारी (ता.११) १७१ व्या दिवशी धरणे आंदोलन मागे घेतले.
महामार्ग गावातून जाऊ नये यासाठी उपोषणास बसलेल्या दुकानदार व्यापाऱ्यांनी सोमवारी (ता.११) १७१ व्या दिवशी धरणे आंदोलन मागे केले. शासनाच्या या निर्णयाचे आंदोलकांनी एकमेकांना पेढे भरवून व पेढे वाटून स्वागत केले.
सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या राजपत्रात पालखी महामार्ग गावा बाहेरून जाणार (रिअलाईमेंट) असे प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तो रद्द व्हावा यासाठी बेमुदत धरणे आंदोलन केले होते. दरम्यान, गावातील दुकानदार व व्यापाऱ्यांनी ही २३ जानेवारी २०२२ पासून सुवर्णयुग गणेश मंदिरासमोर गावातून पालखी महामार्ग जाऊ नये व शासनाने तसे लेखी द्यावे यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. सोमवारी आंदोलनाचा सलग १७१वा दिवस होता. मात्र, राजपत्रात पालखी महामार्ग गावाबाहेरून जात असल्याचे प्रसिद्ध होताच आंदोलन कर्त्यांनी आपले बेमुदत धरणे आंदोलन समाप्त केले.
गावातून पालखी महामार्ग होऊ नये यासाठी ज्येष्ठ नेते ( कै.) ज.मा.मोरे यांचे योगदान दुकानदार व व्यापारी कधी विसरणार नाहीत. शासनाने पुन्हा प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातचे आम्ही स्वागत करतो.
बाजारपेठ होणार होती उद्ध्वस्त
आंदोलनकर्ते मच्छिंद्र चांदणे, दशरथ डोंगरे व भारत मोरे म्हणाले, पालखी महामार्ग गावातून गेला असता तर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ उद्ध्वस्त झाली असती. यामध्ये अडीचशे पेक्षा जास्त छोटी मोठी दुकाने पडणार होती. तीस कुटुंबे बेघर होणार होती तर सोळा विधवा महिलांचे उपजीविकेचे छोटे व्यवसाय कायमचे बंद पडणार होते.
01219
Web Title: Todays Latest District Marathi News Ket22b00821 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..