शेटफळ तलावामध्ये फिडींग सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेटफळ तलावामध्ये फिडींग सुरू
शेटफळ तलावामध्ये फिडींग सुरू

शेटफळ तलावामध्ये फिडींग सुरू

sakal_logo
By

निमगाव केतकी, ता.१९ : नीरा खोऱ्यातील धरण साखळीत सध्या समाधानकारक पाऊस सुरू असल्याने पाटबंधारे विभागाने इंदापूर तालुक्यातील शेटफळ (ता.इंदापूर) तलावात नुकतेच नीरा डावा कालव्यातून पाणी फिडींग करण्यास सुरुवात केल्याची माहिती निमगाव केतकी उपविभागाचे सहायक अभियंता आश्विन पवार यांनी दिली.

पवार म्हणाले, की नीरा खोऱ्यातील भाटघर धरण ४८ टक्के, नीरा देवघर ४१ टक्के व वीर धरण ९० टक्के भरले असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस अगोदर शेटफळ तलावात पाणी फिडींग करण्यास सुरुवात केली आहे.
शेटफळ तलावातून कालव्या द्वारे उन्हाळी हंगामात शेतीसाठी तीने आवर्तने दिली होती.खात्याने या आवर्तनाचे चांगले नियोजन केल्यामुळे तलावात सध्या तीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे.
शेटफळ तलावाची पाणी साठवण क्षमता ६२० दक्षलक्ष घनफूट एवढी आहे. सध्या सुरू केलेले फिडींग हे एक महिना चालणार आहे. एवढ्या कालावधीत तलाव पूर्णक्षमतेने भरणार आहे.या कालव्यावर अवलुंबन असलेल्या १४ गावातील १९२० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते.
निमगाव केतकी उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील निमगाव केतकी, अंथुर्णे व बावडा या शाखेतील लाभक्षेत्रात सध्याचे पर्जन्यमान अल्पप्रमाणात आहे. खरिपासाठी शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्जा सोबत सिंचनासाठी पाणी पट्टी भरावी.

01231

Web Title: Todays Latest District Marathi News Ket22b00827 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..