शेतकरी प्रबोधन मोहीम प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी प्रबोधन मोहीम प्रतिसाद
शेतकरी प्रबोधन मोहीम प्रतिसाद

शेतकरी प्रबोधन मोहीम प्रतिसाद

sakal_logo
By

निमगाव केतकी, ता.२४ : आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीन शेतकरी प्रबोधन मोहिम सुरू आहे. त्यास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष शिवाजी नांदखिले यांनी दिली.
शेतकरी प्रबोधन मोहिमेकरिता शेतकरी संघटनेचे पदाधिकारी निमगाव केतकी येथे आले होते. यावेळी नांदखिले म्हणाले, की सध्या शेतकरी सरकारच्या जाचाला घाबरलेला आहे. त्याने याला घाबरुन आत्महत्या न करता सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला कसा लढा द्यायचा या बाबत प्रबोधन करण्यात येत आहे.
नाव गरीबाच अन् सरंक्षण उद्योगपतींना अस सध्याच धोरण आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेती मालाला उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा कधी मिळणार फक्त घोषणा करुन शेतकऱ्यांची चेष्टा केली जाते. गहु, साखर, कांदा यावर निर्यात बंदी आहे. सर्व शेती मालावरची कायमची निर्यात बंदी उठवली तर शेतकऱ्यांना सरकारला भीक मागावी लागणार नाही. वीज बिले, कर्जे शेतकऱ्यांनी भरू नयेत.

या वेळी संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष निलकंठ शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष हनुमंत वीर, पुणे जिल्हा प्रभारी मंगेश घाडगे, संपर्क प्रमुख हनुमंत माने, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष सचिन काथमिरे, हिरामण जाधव, बाळासाहेब शहाणे, दिनेश म्हेत्रे, दादासाहेब किरकत, राजू घनवट, सोमनाथ कुचेकर, गजानन नरुटे उपस्थित होते.

01247

Web Title: Todays Latest District Marathi News Ket22b00835 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..