
कृषिकन्यांकडून महिलांना लघुउद्योगाचे धडे
निमगाव केतकी, ता.२६ : येथील (ता.इंदापूर) बारवकर वस्तीवरील महिलांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांनी महिला
लघू उद्योगाबाबत मार्गदर्शन केले. टोमॅटो सॉस, केचप व दुधापासून पनीर कसे बनवले जाते याची प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली.
ग्रामीण जागरूकता कार्यक्रमांतर्गत शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर. जी. नलवडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एन. एकतपुरे, विषय शिक्षक प्रा. एन.बी. गाढवे व प्रा. एस. एल. मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषी कन्या शिवांजली बडे, संजना मोहिते, राजनंदिनी माने देशमुख, धनश्री जगताप, गिरीजा इनामदार, कोमल इंगळे व पल्लवी कोळी यांनी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
महिलांनी केवळ शेतीवर विसंबून न राहता शेतीशी निगडित असणारे अनेक लघुउद्योग करून स्वतःचा विकास साधला पाहिजे. बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असणारे कमी जागा व थोड्या भांडवलामध्ये करता येणारे केळीचे वेफर्स कसे बनवले जातात. याबाबत कृषिकन्यांनी मार्गदर्शन केले. तसेच टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप व दुधापासून पनीर कसे बनवले जाते याचे प्रात्यक्षिकांद्वारे लघु उद्योग करण्यासाठी प्रोत्साहित केले.
01257
Web Title: Todays Latest District Marathi News Ket22b00840 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..