गिरगायीची अट काढून टाकावी : ॲड. करे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गिरगायीची अट काढून टाकावी : ॲड. करे
गिरगायीची अट काढून टाकावी : ॲड. करे

गिरगायीची अट काढून टाकावी : ॲड. करे

sakal_logo
By

निमगाव केतकी, ता.२३ : पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे नैसर्गिक शेतीस प्रोत्साहन योजना राबविली जात असून, या योजनेतील गिरगायीची अट काढून टाकावी किंवा त्यास खिल्लार गायीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा सुकाणू समितीचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत करे यांनी केली आहे.
करे म्हणाले, की जिल्हा परिषदेने केंद्र सरकारची नैसर्गिक शेती प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. या योजनेत एक गिरगायी, शेतकरी प्रशिक्षण, गांडूळ निर्मिती, जैविक खत, बायोडामिक खत युनिट असे एकत्रित नैसर्गिक शेतीस अनुदान ६५ हजार रुपये आहे.
आपल्या भागामध्ये देशी खिलार, मान देशी काजळी खिल्लार या जाती आढळतात व येथील वातावरणात ही त्या सूट होतात असे असताना जिल्हा परिषदेने या योजनेमध्ये गिरगायीचा हट्ट कशासाठी केला आहे, असा सवाल ॲड. करे यांनी केला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ket22b00864 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..