अस्तरीकरणाचे काम हाणून पाडू : रायते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अस्तरीकरणाचे काम हाणून पाडू : रायते
अस्तरीकरणाचे काम हाणून पाडू : रायते

अस्तरीकरणाचे काम हाणून पाडू : रायते

sakal_logo
By

निमगाव केतकी, ता.२३: ''''नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम झाल्यास परिसरातील शेतकरी देशोधडीला लागणार आहे. सदरचे काम बळजबरीने करण्याचा प्रयत्न केल्यास हे काम शेतकरी संघटना हाणून पाडतील,'''' असा इशारा पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी दिला.
अस्तरीकरणच्या विरोधात दिशा ठरवण्यासाठी आज शेळगाव (ता.इंदापूर) नजीक तेल ओढा येथील श्री संत सावता माळी मंदिरात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी यांची पहिली बैठक झाली.

यावेळी रायते म्हणाले, नीरा डावा कालव्याचे पहिल्या टप्प्यात सुमारे ३५ किलोमीटर एवढे अस्तरीकरण होणार आहे. हे काम जर झाले तर कालव्याच्या परिसरातील शेतकरी पूर्णपणे संकटात सापडणार आहे.अस्तरीकरण झाल्यास शेतीमालाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होऊन शेतकरी आणखीनच अडचणीत येणार आहे. मागील आघाडी सरकारच्या काळामध्ये अस्तरीकरण करण्याचा चुकीचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या वेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिदास पवार युवा आघाडीचे अध्यक्ष सचिन कोथमिरे, तुकाराम निंबाळकर, मंगेश घाडगे, दादा किरकत, चंद्रकांत चव्हाण, दीपक कोथमिरे उमेश ननवरे, सावळा ननवरे, संतोष भांगे अनिल राऊत, सचिन सुळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

01305

Web Title: Todays Latest District Marathi News Ket22b00865 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..