जयभवानी महिला विकास पतसंस्था सभासदांना देणार सात टक्के लाभांश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयभवानी महिला विकास पतसंस्था सभासदांना देणार सात टक्के लाभांश
जयभवानी महिला विकास पतसंस्था सभासदांना देणार सात टक्के लाभांश

जयभवानी महिला विकास पतसंस्था सभासदांना देणार सात टक्के लाभांश

sakal_logo
By

निमगाव केतकी, ता. १ : काटकसर व पारदर्शक कारभार असलेल्या येथील जयभवानी महिला विकास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेस सन २०२१-२२ मध्ये ८२ हजार रुपयांचा नफा झाला असून, संस्था सभासदांना सात टक्के लाभांश देणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा अमोद हिंगाणे यांनी दिली.
पतसंस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष अनुराधा हिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे सचिव वैभव कोकणे यांनी अहवाल वाचन केले. संस्थेचे भाग भांडवल १४ लाख ६२ हजार ८५० एवढे आहे. कर्ज वाटप दोन कोटी १८ लाख ९९ हजार ०६३ एवढे आहे तर गुंतवणूक एक कोटी ९८ लाख ४१हजार ३२५ एवढी आहे.
या वेळी संस्थेच्या उपाध्यक्ष शोभा विजयकुमार भागवत, केशर दिलीप आदलिंग, सीमा संतोष होरा, सीमा राजकुमार शहा, सुनीता पुरुषोत्तम भागवत, सविता अशोक हेगडे, आशा विजय शहाणे, सुनंदा देवराज जाधव, उज्वला बाळासाहेब जगताप, स्वाती संदीप चिखले, विजया दिलीप पाटील सुरेखा राहुल मिसाळ या संचालकसह सभासद उपस्थित होते.
तसेच या वेळी संस्थेचे मार्गदर्शक सर्जेराव जाधव, विजयकुमार भागवत, संतोष होरा, हनुमंत जाधव, अमोद हिंगाणे, दिलीप आदलिंग उपस्थित होते. आभार सीमा होरा यांनी मानले.