''दिवाळी संपत आली तरी भरपाई कधी मिळणार?'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''दिवाळी संपत आली तरी भरपाई कधी मिळणार?''
''दिवाळी संपत आली तरी भरपाई कधी मिळणार?''

''दिवाळी संपत आली तरी भरपाई कधी मिळणार?''

sakal_logo
By

निमगाव केतकी, ता.२४ : ''''यंदाच्या अतिवृष्टीने सर्व पिके वाया गेली शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र बांधापर्यंत अद्याप कोणीही आले नाही. दिवाळी संपत आली तरी नुकसान भरपाई कधी मिळणार?'''' असा सवाल निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील फळ भाजीपाला तरकारी उत्पादक शेतकरी राजू गौतम भोंग यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केला

यावेळी भोंग म्हणाले की, आपण दोन ते अडीच लाख रुपये खर्च करून टोमॅटो काकडी कारले मिरची ही पिके घेतली होती. सर्व पिकांचा एकच तोडा निघाला आणि अतिवृष्टीने सर्व पिके उद्‌ध्वस्त झाली. शासनाने तातडीने नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याची नितांत गरज आहे.
शेतकरी सुकाणू समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीकांत करे म्हणाले, की परतीच्या पावसाने जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरिपातील पिके, पालेभाज्या, द्राक्षासह अन्य फळबागा, भाजीपाला यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. मात्र, अद्याप याचे पंचनामे झालेले नाहीत. शासनाने आता पंचनामे करण्यात व कागदी घोडे नाचविण्यात वेळ घालवू नये. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट थेट नुकसान भरपाई देण्यात यावी. याबाबत निमगाव केतकीचे मंडल अधिकारी शहाजी राखुंडे यांना संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.