निमागावातील ३१ शेतकऱ्यांचे उपोषण मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निमागावातील ३१ शेतकऱ्यांचे उपोषण मागे
निमागावातील ३१ शेतकऱ्यांचे उपोषण मागे

निमागावातील ३१ शेतकऱ्यांचे उपोषण मागे

sakal_logo
By

निमगाव केतकी, ता.१३ : निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी (९६५ जी) महामार्गावरील बाह्यवळण रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील सात दिवसापासून उपोषणाला बसलेले ३१ शेतकऱ्यांनी आज (ता. १३) रात्री सातव्या दिवशी उपोषण मागे घेतले. बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठविले असल्याचे सांगितल्यानंतर लहान मुलांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत घेऊन उपोषण सोडले.

यावेळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, प्रभारी पोलिस निरीक्षक प्रशांत सूर्यवंशी, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय सचिव ॲड.राहुल मखरे यांच्यासह उपोषणकर्ते यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य शेतकरी व उपोषणाला पाठिंबा दर्शविणारे विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, संघटना सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कांबळे म्हणाले की, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी जो अहवाल दिला तो अहवाल जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था आणि आरोग्य विभाग तसेच पोलिसांचा जो अहवाल आहे त्याचा संदर्भ टाकून पुढील जी प्रक्रिया आहे ती ठाम निर्णय होईपर्यंत स्थगिती किंवा हे काम थांबवावे अशी विनंती केलेली आहे. त्याच्या अनुषंगानेच स्थगिती मिळण्याच्या कामासाठी आम्ही तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठवलेला आहे. जिल्हाधिकारी देखील तो अहवाल राज्य सरकारला पाठवणार आहेत आणि ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देणार आहेत. प्राधिकरणाशी पत्रव्यवहार होणार आहे. त्यामुळे काही ना काही निर्णय नक्की होईल असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या आमरण उपोषणाला माजी राज्यमंत्री इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन तुमचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते.
बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज उपोषणकर्त्यांना दूरध्वनीवरून संवाद साधत आरोग्याची काळजी घ्यावी व आंदोलन मागे घ्यावे, गुरुवारी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी बैठक लावण्यात येणार असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांच्या वतीने उपोषणकर्ते सर्जेराव जाधव, तात्यासाहेब वडापुरे, संदीप भोंग, मच्छिंद्र आदलिंग,ॲड.सचिन राऊत, कुलदीप हेगडे, विठ्ठल वडापुरे, चंद्रकांत वडापुरे. भारत बरळ यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.

01479