कडबनवाडीत निसर्गप्रेमीकडून ऑक्सिजन पार्कची निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कडबनवाडीत निसर्गप्रेमीकडून ऑक्सिजन पार्कची निर्मिती
कडबनवाडीत निसर्गप्रेमीकडून ऑक्सिजन पार्कची निर्मिती

कडबनवाडीत निसर्गप्रेमीकडून ऑक्सिजन पार्कची निर्मिती

sakal_logo
By

निमगाव केतकी, ता.१३. कडबनवाडी (ता. इंदापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते भजनदास पवार यांनी गावात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात योगदान दिले. पर्यावरण रक्षणसाठी त्यांनी आता वृक्ष लागवडीवर भर दिला असून, तीन वर्षात त्यांनी गावाच्या परिसरातील वनीकरणात सुमारे दोन हजार देशी रोपांचे लागवड करून ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली आहे पदरमोड करून ठिबकच्या पाण्यावर शेतकऱ्यांच्या मदतीने झाडे जोपासण्याचा पर्यावरणाचा यज्ञ वृद्धिंगत केला आहे.

कडबनवाडी व परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये वनीकरण आहे. सन २०२० मध्ये पवार यांच्या पुढाकाराने गावालगत वीस एकरच्या उजाड क्षेत्रावर दीर्घकाळ टिकणारी व जास्त सावली देणारी वड, पिंपळ, चिंच, जांभूळ अशी तीन वर्ष वाढलेली १००० रोपांची लागवड करून ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली. यासाठी त्यांना लायस क्लब चिंचवड रॉयलने रोपे उपलब्ध करून दिली. सतीश गावडे या शेतकऱ्याने व ग्रामपंचायतीने पाणी दिले.

कडबनवाडीतील वन पर्यटन चौकी शेजारील वनीकरणातील पाच एकर व यंदा पाच एकर क्षेत्रामध्ये अशाच प्रकारची ४०० रोपे लावली. यासाठी त्यांना माणिक गावडे या शेतकऱ्याने पाणी दिले. त्यांचा हा दुसरा प्रयोग यशस्वी झाल्याने त्यांचे तालुक्यात कौतुक होत आहे.

शेळगाव -रुई रस्त्यावर ४०० रोपांची लागवड
सप्टेंबरमध्ये शेळगाव - रुई या रस्त्याला तीन किलोमीटरच्या अंतरात दोन्ही बाजूंनी ३०० देशी रोपांची लागवडी केली. पाण्यासाठी ठिबकचा वापर केला. तर मागील आठवड्यात शेळगाव -रुई रस्त्यालाच पुन्हा एक किलोमीटर अंतरावर शंभर झाडांची लागवड केली. ही झाडे वन आणि वन्यजीव संस्था यांच्यातर्फे आदित्य कुलकर्णी यांनी दिली. या ठिकाणचे शेतकरी संजय चव्हाण व संदीप झगडे यांनी ठिबक साठी पाणी दिले आहे.

''झाडे लावा झाडे जगवा'' ही संकल्पना प्रत्यक्षात रुजवली आहे. वृक्षारोपण करणे सोपे परंतु त्याचे संवर्धन करणे अवघड असते. सर्व झाडे ग्रामस्थांच्या मदतीने जगवून दाखवली आहेत. यापुढेही फक्त झाडांसाठीच जीवन जगणार आहे.
- भजनदास पवार, सामाजिक कार्यकर्ते

01511