इंदापुरातील शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रुटची भुरळ

इंदापुरातील शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रुटची भुरळ

मनोहर चांदणे : सकाळ वृत्तसेवा
निमगाव केतकी, ता.८ : प्रगतशील शेतकरी बाजारपेठेचा अभ्यास करून कोणत्या पिकाला अधिक मागणी राहील याचा विचार करून, शेतकरी नवनवीन प्रयोग स्वतःच्या कल्पकतेने वाढवत आहे. ऊस, द्राक्ष, डाळिंब, पेरू, शेडनेट व पॉलिहाऊसमधील भाजीपाला याबरोबरच आता इंदापूर तालुक्यातील शेतकरी विविध आजारावर गुणकारी असलेल्या ड्रॅगन फ्रुटकडे वळला आहे. कमी उत्पादन खर्चात एकरी सात ते आठ लाख रुपये उत्पन्न देणाऱ्या ड्रॅगन फ्रुटची तालुक्यात सतरा हेक्टर लागवड झाली असून, सध्या ती वाढतच आहे.

ड्रॅगन फ्रूटची लागवड पावसाळ्यामध्ये केली जाते. पाऊस पडल्यानंतर याला कळी व फुले लागतात. त्यानंतर दीड महिन्यात फळ तयार होते. एका बहरात जून ते डिसेंबरपर्यंत चार ते पाच वेळा फळांची तोडणी होते.
इंदापूर तालुक्यात १७ हेक्टर क्षेत्रावर शेतकरी याचे उत्पादन घेत आहेत. यामध्ये निमगाव केतकी येथील उत्तम नामदेव शेंडे, राजू भोसले, तानाजी देवकर, वरकुटे खुर्द येथील आशिष शेंडे, महादेव शेंडे, पिटकेश्वर येथील दादाराम शेंडे, गोतंडी येथील गणेश ठवरे, व्याहळी येथील पोपट भोई हे दर्जेदार उत्पादन घेत आहेत.


८ टन...... एकरी उत्पादन
५० ते २०० रुपये... प्रतिकिलो भाव
५ लाख रुपये.... लागवडीचा खर्च
१, ८०,००० रुपये.... हेक्टरी अनुदान


अशी करा लागवड
१. पिकासाठी निचऱ्याच्या जमिनीची आवश्‍यकता
२. दोन ओळीतील अंतर बारा फूट व दोन झाडातील अंतर आठ फूट
३. खड्डे खोदून सहा फूट उंचीचे खांब लावले बसवावेत
४. खांबाच्या चार बाजूला चार रोपांची लागवड करावी
५. खांबाला रोपे बांधून पाने वर आल्यानंतर त्यांचा विस्तार होतो
६. यासाठी खांबाच्या टोकाला गोल किंवा चौकोनी खिडकी बसवावी.

या जातींचे होते महाराष्ट्रात उत्पादन
* जम्बो रेड, * जीएरेड * येलो रेड


औषध फवारणीचा खर्चही अल्प
ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी औषधे व खतांचा खर्च कमी प्रमाणात होतो. रासायनिक खते पाच टक्के पेक्षा अधिक वापरले जात नाहीत. गांडूळ खत, शेणखत, लिंबोळी खत यांचा वापर केला जातो. याचा एकरी खर्च पन्नास हजारापर्यंत होतो. गोगलगाय व मुंग्यांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महिन्यातून एक कीटकनाशकाची फवारणी करावी लागते.

ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी दोन एकरला दहा लाख रुपये खर्च आला. मागच्या वर्षी दोन एकरमध्ये दहा टन माल निघाला. सरासरी शंभर रुपये भाव मिळाल्याने पहिल्या पिकात लागवडीसाठी केलेला खर्च निघाला. सध्या या फळाला जास्त मागणी वाढल्याने व्यापारी जागेवर येऊन खरेदी करत आहेत. सुरुवातीचा खर्च सोडल्यास त्यानंतर प्रत्येक बहराला साधारणपणे ७० ते ८० हजार पर्यंत खर्च येतो व चांगले उत्पादन घेतल्यास सात ते सात लाखापर्यंत उत्पन्न मिळत आहे.
- उत्तम शेंडे, ड्रॅगन फ्रुटचे उत्पादक, निमगाव केतकी

सुमारे बारा वर्षांपूर्वी सहा एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली होती. कोरोना काळामध्ये या पिकाला मोठी मागणी होती. एकदा लागवड केल्यानंतर वीस वर्षांपर्यंत या पिकातून उत्पादन घेता येते. महाराष्ट्रामध्ये दररोज २५ टन मालाची मागणी आहे. हलक्या जमिनीत
कमी पाण्यात कमी उत्पादन खर्चात शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रूट सध्या वरदान ठरत आहे.
- राजेंद्र देशमुख, संचालक, महाराष्ट्र ड्रॅगन फ्रूट असोसिएशन, उत्पादक, बार्शी


01597, 29221

1989670871
1680635362

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com