सराफवाडीत कृषिपूरक उद्योगांना विद्यार्थ्यांची भेट

सराफवाडीत कृषिपूरक उद्योगांना विद्यार्थ्यांची भेट

निमगाव केतकी, ता.२६ : सराफवाडी (ता. इंदापूर) येथील नंदिकेश्वर प्रगती विद्यालयातील नववीतील विद्यार्थ्यांनी परिसरातील कृषिपूरक उद्योगांना नुकतीच भेट दिली. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विविध व्यावसायिक कौशल्ये तसेच उद्योजकीय कौशल्ये विद्यार्थ्यांना अवगत व्हावीत म्हणून या भेटीचे आयोजन केल्याचे विज्ञान शिक्षक आर.एन. नलवडे व श्रीमती जे.एम. बरळ यांनी सांगितले.
मुख्याध्यापक आर.ए. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शेतकरी भारत अभंग यांच्या रेशीम उद्योग प्रकल्पाला विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि रेशीम उद्योग प्रकल्प समजून घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना तुती लागवडीपासून ते रेशीम अळीच्या वाढीच्या विविध अवस्था व त्या अवस्थांमध्ये त्यांना कशाप्रकारे खाद्य दिले जाते याविषयी सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांना घरबसल्या जोडधंदा उपलब्ध करून देणारा हा रेशीम उद्योग शेतकऱ्यांनी जरूर करावा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी परिसरातील किसन अभंग यांच्या कुक्कुटपालन आणि पशुपालन प्रकल्पाला भेट दिली. यामध्ये विद्यार्थ्यांनी पशुपालनासाठी आवश्यक असणारी गोठ्याची रचना तसेच कुकूटपालनासाठी आवश्यक असणारी शेडची रचना यांचा अभ्यास केला. याबरोबरच पशुपालनासाठीचे चारा नियोजन आणि कुक्कुटपालनाचे खाद्याचे नियोजन याची माहिती विद्यार्थ्यांनी संबंधितांकडून घेतली.

....................
01661

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com