निमगावात नुकसानीची शिवतारे यांच्याकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निमगावात नुकसानीची शिवतारे यांच्याकडून पाहणी
निमगावात नुकसानीची शिवतारे यांच्याकडून पाहणी

निमगावात नुकसानीची शिवतारे यांच्याकडून पाहणी

sakal_logo
By

निमगाव केतकी, ता.१६. निमगाव केतकी परिसरात मागील तीन दिवसात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाला शनिवारी (ता.१५) शिवसेनेचे उपनेते माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी भेट देवून पाहणी केली. त्यांनी नुकसानग्रस्तांना शासनाच्या वतीने भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली.
शिवतारे यांनी निमगाव केतकीतील वीज पडून गाई दगावलेल्या मदन पाटील यांच्या गोठ्याला तसेच कृष्णा आदलिंग व भारत बरळ यांचे भुईसपाट झालेल्या मका पिकाच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
यावेळी शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांनी वीज पडून गाई दगावलेल्या शेतकऱ्याला ५० हजार रुपयाची मदत घोषित केली. यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील व गावकामगार तलाठी गोरक्षनाथ इंगळे यांच्याकडून शिवतारे यांना नुकसानग्रस्त भागातील पंचनामे केल्याची सविस्तर माहिती दिली.
या वेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे, पप्पू माने, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, बबन खराडे, देविदास भोंग, सीमा कल्याणकर, अशोक देवकर, हर्षवर्धन पाटील, बापू खराडे, हेमंत पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, निमगाव केतकी च्या कुस्ती आखाड्यासाठी २५ लाख रुपयांचा निधीची घोषणा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली. त्यामुळे त्यांचा सत्कार संत सावतामाळी मंदिरात गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी दत्तात्रेय शेंडे, अंकुश जाधव, देवराज जाधव, ॲड. कृष्णाजी यादव, बबन खराडे, तात्यासाहेब वडापुरे, राहुल जाधव, कुलदीप हेगडे उपस्थित होते.

01702