खेड शिवापूर येथील मारामारीप्रकरणी ११ जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड शिवापूर येथील मारामारीप्रकरणी ११ जणांवर गुन्हा
खेड शिवापूर येथील मारामारीप्रकरणी ११ जणांवर गुन्हा

खेड शिवापूर येथील मारामारीप्रकरणी ११ जणांवर गुन्हा

sakal_logo
By

खेड-शिवापूर, ता. ५ : खेड शिवापूर येथील दर्गा फाट्यावर झालेल्या अपघाताविषयी विचारपूस करण्याच्या कारणावरून दोन गटांत मारामारी झाली. याप्रकरणी राजगड पोलिसांनी दोन्ही गटातील ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी विद्यासागर अभिमन्यू गवळी आणि अक्षय प्रकाश कोंडे यांनी परस्परविरोधी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. सोमवार (ता.२) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खेड-शिवापूर येथील दर्गा फाट्यावर पीक अप गाडीचा अपघात झाला होता. याबाबत गवळी विचारपूस करण्यासाठी गेला होता. यावेळी तेथे जमलेल्या लोकेश भास्कर कोंडे, हर्षद मोहन कोंडे, वैभव ऊर्फ सनी विठ्ठल कोंडे, अक्षय प्रकाश कोंडे, गणेश शहाजी कोंडे, विशाल दीपक कोंडे (सर्व. राहणार खेड, ता. हवेली, पुणे) यांनी अभिमन्यू आणि त्याचा भाऊ विशाल याला मारहाण केली, असे गवळी याने फिर्यादीत म्हटले आहे.

तर दर्गा फाटा येथे अपघात झालेल्या ट्रक चालकाला मारहाण करू दिली नाही, म्हणून सागर गवळी, विशाल गवळी, किशोर अवतारे, किरण वाघमारे, रामू कांबळे (सर्व रा. खेड शिवापूर, शिवाजीनगर, ता. हवेली, पुणे) यांनी शिवीगाळ व दमदाटी करून मला मारहाण केली, असे अक्षय याने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस हवलदार राहुल कोल्हे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Khd22b01018 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top