
शिवापूर टोल नाक्यासासाठी गडकरींना पत्र शिवापूर टोल नाक्यासासाठी गडकरींना पत्र
खेड-शिवापूर, ता. १० : पुणे- सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाका भोर तालुक्याच्या हद्दीच्या पुढे स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे केली आहे. स्थानिकांच्या या मागणीचा विचार करण्याची विनंती सुळे यांनी या पत्राद्वारे गडकरी यांना केली आहे.
खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती २०१९ पासून टोलनाका स्थलांतरित करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन करत आहे. १ मे रोजी याच मागणीसाठी कृती समितीने कात्रज चौकात सर्वपक्षीय आंदोलन केले होते. तसेच याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडेही वारंवार पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत खासदार सुळे यांनी खेड-शिवापूर टोलनाका स्थलांतरित करण्याबाबत गडकरी यांना पत्र पाठवले आहे.
"खेड-शिवापूर टोलनाका पीएमआरडीएच्या हद्दीत येतो. सातारा महामार्गावर रस्त्याच्या अत्यंतजवळ असल्यामुळे भोर फाट्यापर्यंत केवळ २५ किलोमीटरसाठी स्थानिकांना आणि पुणे येथील नागरिकांना ८० किलोमीटरचा टोल भरावा लागत आहे. या महामार्गावर ५० ते ६० किलोमीटरच्या परिसरात अनेक पर्यटन स्थळे, देवस्थाने, ऐतिहासिक स्थळे असून पुणेकर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणांना भेटी देत असतात. तरी स्थानिक ग्रामस्थ आणि पुणेकरांना टोल भरावा लागू नये, अशी त्यांच्याकडून गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे. त्यामुळे टोलनाका भोर फाट्याच्या पुढे स्थलांतरित करावा, अशी मागणी खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने केली आहे. त्यामुळे स्थानिकांच्या आणि पुणेकरांच्या मागणीचा विचार होऊन टोलनाका भोर हद्दीच्या पुढे स्थलांतरित करण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी," अशी विनंती खासदार सुळे यांनी गडकरी यांना पत्राद्वारे केली आहे.
विशेष म्हणजे सुळे यांनी गडकरी यांना मार्चमध्ये देखील पत्र पाठवत पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाका प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालावे. तसेच हा टोलनाका पीएमआरडीए हद्दीबाहेर स्थलांतराबाबत कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात," अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Khd22b01020 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..