
तलावाच्या गळतीचे काम चुकीच्या पद्धतीने
खेड-शिवापूर, ता. १२ : शिवरे (ता.भोर) येथील पाझर तलावाची गळती बंद करण्याचे काम निविदेप्रमाणे करण्यात येत नाही. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूनही ते चुकीच्यापद्धतीने सुरू आहे. भविष्यात या पाझर तलावाची गळती थांबली नाही, तर त्याला संबंधित ठेकेदार आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असतील, असे मत शिवरे येथील ग्रामस्थांनी व्यक्त केले.
तलावाची गळती बंद करण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी नुकतेच पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सुनील जाधव आले होते. त्यावेळी शिवरे ग्रामस्थांनी गळती बंद करण्याचे काम निविदेप्रमाणे होत नसल्याचा आरोप केला.
बंधाऱ्याची गळती बंद करण्याचे काम यापूर्वीही दोन वेळा झाले आहे. मात्र, तरीही त्याची गळती थांबली नाही. आता तिसऱ्यांदा गळती बंद करण्याचे काम सुरू असून ते चुकीच्या पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात बंधाऱ्याची गळती थांबणार नसून निधी वाया जाणार आहे. हे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना सांगूनही काम सुरू ठेवले आहे. भविष्यात या बंधाऱ्याची गळती थांबली नाही, तर त्याला ठेकेदार आणि अधिकारी जबाबदार असतील, असे ग्रामस्थ रघुनाथ डिंबळे, अभय डिंबळे आणि अतुल डिंबळे यांनी सांगितले.
पाझर तलावाचे काम नियमाप्रमाणे सुरू आहे. त्यामुळे गळती होणार नाही, असा आम्हाला आत्मविश्वास आहे. सध्या आमच्याकडे माणसांची कमतरता असून गावकऱ्यांनीच येथे थांबून कामावर लक्ष ठेवावे.
- सुनील जाधव, उपअभियंता, पाटबंधारे विभाग
63672
Web Title: Todays Latest District Marathi News Khd22b01021 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..