बैलगाडा शर्यतीचे श्रेय महाविकास आघाडीचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बैलगाडा शर्यतीचे श्रेय महाविकास आघाडीचे
बैलगाडा शर्यतीचे श्रेय महाविकास आघाडीचे

बैलगाडा शर्यतीचे श्रेय महाविकास आघाडीचे

sakal_logo
By

खेड शिवापूर, ता. २३ : ‘‘बैलगाडा शर्यती सुरू झाल्या असून, आज आपण सर्व बैलगाडा शर्यतींचा आनंद घेत आहोत, त्याचे श्रेय महाविकास आघाडी आणि खासकरून खासदार अमोल कोल्हे यांचे आहे,’’ असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
कोंढणपूर (ता. हवेली) येथे रविवारी खडकवासला विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उपमुख्यमंत्री केसरी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले होते. त्यास सुळे यांनी भेट दिली, यावेळी त्या बोलत होत्या. माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, जिल्हा परिषद सदस्या पूजा पारगे, शुक्राचार्य वांजळे, संदीप मुजुमले, सचिन दोडके, काका चव्हाण, अशोक गोगावले, सायली वांजळे, जितेंद्र कोंडे आदी यावेळी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, ‘‘बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी राज्यातून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने प्रयत्न केले. तर, दिल्लीत खासदार अमोल कोल्हे यांनी त्याबाबत पाठपुरावा केला. बैलगाडा शर्यती पाहण्याचा आनंद घेतानाच आपण शिस्त आणि सुरक्षितता याचीही काळजी घेतली पाहिजे.’’

शर्यतीचा निकाल
या शर्यतीत २०० बैलगाडे सहभागी झाले होते. मोठ्या संख्येने प्रेक्षक या बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी हजर होते. या बैलगाडा शर्यतीचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक- सरदार वादळ. दुसरा क्रमांक- बाबाराजे जगताप तेजा आणि शंकर ११३०. तिसरा क्रमांक- भारत आणि सुंदर. चौथा क्रमांक- निशाणा तेजा (वडकी). पाचवा क्रमांक- चंदर (शिंदेमाल) आणि सल्या. सहावा क्रमांक- अशोक जोशी बलमा आणि अशोक योगी बलमा.

Web Title: Todays Latest District Marathi News Khd22b01029 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..