‘सातारा रस्त्यावरील अतिक्रमणे २ जूनपर्यंत हटवा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सातारा रस्त्यावरील अतिक्रमणे २ जूनपर्यंत हटवा’
‘सातारा रस्त्यावरील अतिक्रमणे २ जूनपर्यंत हटवा’

‘सातारा रस्त्यावरील अतिक्रमणे २ जूनपर्यंत हटवा’

sakal_logo
By

खेड शिवापूर, ता. २८ : पुणे-सातारा महामार्गाच्या कक्षेत पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा ठरणारी अतिक्रमणे संबंधितांनी ताबडतोब काढावीत. अन्यथा २ जूनपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (''एनएचएआय'') रस्त्यावरील ही अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करण्यात येईल. यावेळी कोणाचे नुकसान झाल्यास त्याला ''एनएचएआय'' जबाबदार राहणार नाही, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.
याबाबतचे एक पत्रक ''एनएचएआय''ने प्रसिद्ध केले आहे. सध्या पुणे-सातारा रस्त्याच्या (देहूरोड ते सातारा) सहा पदरीकरणाची कामे, देखभाल दुरुस्तीचे काम, देखभाल उपाय, सुरक्षा उपाय आणि इतर कामे अंतिम टप्प्यात आहेत. सध्या महामार्गाची पाहणी केली असता अनेक ठिकाणची अतिक्रमणे पावसाचे पाणी वाहण्यास अडथळा ठरून वाहतुकीस अडचण ठरत असल्याचे ''एनएचएआय''च्या निदर्शनास आले आहे.
महामार्गाच्या हद्दीत अस्तित्वात असलेल्या नाला, गटार (ड्रेन्स) अतिक्रमणांमुळे बंद करण्यात आलेल्या आहेत. अनेक ठिकाणी नाले बुजवून त्याठिकाणी काँक्रिट रस्ते तयार केले आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकत नाही. तसेच डांबरीकरणाचे नुकसान होऊ शकते. महामार्गालगतच्या व्यावसायिकांनी सांडपाणी रस्त्यावर सोडल्यामुळे वाहतुकीस अडचणी निर्माण होत आहे. पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पाईपांमधून विजेच्या वायर, छोट्या पाइप लाईन नेण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा होत आहे.
जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि जनतेस विनंती करण्यात येते की सदरील रस्त्यावरील अतिक्रमणे आपणाकडून झाली असल्यास ती आपण त्वरित काढून टाकावीत. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास सहकार्य होईल, असे आवाहन या पत्रकात करण्यात आले आहे.


"पुणे-सातारा महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र अनेक ठिकाणी महामार्गाच्या कक्षेत पावसाचे पाणी वाहून नेण्यास अडथळा ठरणारी अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे प्रथम प्राधान्याने हटविली जाणार आहेत. संबंधितांनी ही अतिक्रमणे २ जूनपर्यंत हटवावीत. अन्यथा २ जूनपासून ''एनएचएआय''कडून ही अतिक्रमणे हटविण्यात येतील."
-संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Web Title: Todays Latest District Marathi News Khd22b01034 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top