शिंदेवाडी येथील अपघातात कार झाली पलटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदेवाडी येथील अपघातात कार झाली पलटी
शिंदेवाडी येथील अपघातात कार झाली पलटी

शिंदेवाडी येथील अपघातात कार झाली पलटी

sakal_logo
By

खेड शिवापूर, ता. ५ : पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी (ता. भोर) येथे ट्रकने मोटारगाडीला धडक देऊन झालेल्या अपघातात मोटारगाडी दुभाजकाला धडकून पलटी झाली. सुदैवाने मोटारगाडीच्या एअर बॅग्ज उघडल्याने मोटारगाडीतील कोणालाही दुखापत झाली नाही.
पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी पोलिस चौकीच्या समोर रविवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. मोटारगाडी आणि ट्रक पुण्याच्या दिशेने निघाले होते. यावेळी ट्रकच्या पाठीमागच्या बाजूचा धक्का मोटारगाडीला लागला. त्यामुळे मोटारगाडी रस्त्यामधील दुभाजकाला धडकून रस्त्यावर उलटली. या अपघातात मोटारगाडीच्या एअर बॅग्ज उघडल्या. त्यामुळे मोटारगाडीतील कोणालाही दुखापत झाली नाही. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मोटारगाडीतील सर्वांना सुखरूप बाहेर काढले.

Web Title: Todays Latest District Marathi News Khd22b01038 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top