पथदिवे बंद असल्याने गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथदिवे बंद असल्याने गैरसोय
पथदिवे बंद असल्याने गैरसोय

पथदिवे बंद असल्याने गैरसोय

sakal_logo
By

खेड-शिवापूर, ता. १५ : पुणे-सातारा रस्त्यावर पथदिव्यांचे खांब बसवून सुमारे एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र अजूनही हे पथदिवे बंद असल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे. तर पथदिव्यांच्या वीजजोडसाठी अंदाजपत्रक महावितरणच्या मुळशी विभागाकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच हे पथदिवे सुरू होतील, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) सांगण्यात आले.

पुणे-सातारा रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर मुख्य रस्ता आणि सेवा रस्त्यांवर काही वर्षापूर्वी पथदिव्यांचे खांब आणि पथदिवे बसवून झाले आहेत. मात्र अद्याप हे पथदिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांची अडचण होते. विशेषतः सेवा रस्त्यावरून ये-जा करताना स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर हे पथदिवे लवकरात लवकर सुरू करावेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.

याबाबत ''एनएचएआय''चे प्रकल्प संचालक संजय कदम म्हणाले, "रस्त्याच्या पथदिव्यांच्या वीजजोडसाठी आवश्यक अंदाजपत्रक महावितरणच्या मुळशी विभागाकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच पथदिवे सुरू होतील."

00826

Web Title: Todays Latest District Marathi News Khd22b01046 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top