
शेतकऱ्यांना टोमॅटोवरील कीड व्यवस्थापन मार्गदर्शन
खेड-शिवापूर, ता. २ : रांजे (ता. भोर) येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ग्रामसभेत हर घर झेंडा या उपक्रमाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त रांजे गावात ग्रामसभेचे आयोजन केले होते. गावोगावी हर घर झेंडा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. भोरच्या गटविकास अधिकारी स्नेहा देव यांच्या उपस्थितीत गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तिरंगा झेंडा लावणे याबाबत ग्रामसभेला मार्गदर्शन केले. यावेळी सकाळच्या सत्रात गावातील शेतकऱ्यांना कृषी महाविद्यालय पुणे व बँक ऑफ महाराष्ट्राचे ग्रामीण कृषी विभाग यांच्यातर्फे टोमॅटोवरील कीड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक उमेश निकम, संजय मांढरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावातील महिला वर्ग व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी सभेचे अध्यक्ष सरपंच सुप्रिया जायकर, उपसरपंच प्रियांका भोसले ग्रामपंचायत सदस्य, अभिजित कांबळे, प्रदीप जायकर, अश्विनी गुजर, व बचत गट प्रतिनिधी शुभांगी जायकर आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest District Marathi News Khd22b01062 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..