रहाटवडेत पिकांवर गोगलगाईंची टोळधाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रहाटवडेत पिकांवर गोगलगाईंची टोळधाड
रहाटवडेत पिकांवर गोगलगाईंची टोळधाड

रहाटवडेत पिकांवर गोगलगाईंची टोळधाड

sakal_logo
By

खेड-शिवापूर, ता. १५ : रहाटवडे (ता. हवेली) शेतातील पिकांवर गोगलगाईंची टोळधाड पडली आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले असतानाच आता शेतकऱ्यांना नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. उभी पिके आणि उगवणारी रोपे गोगलगाई फस्त करत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून रहाटवडे गावाला गोगलगाईंच्या टोळदाढीला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात त्यांचे प्रमाण वाढते. सुमारे दोन महिन्यांपासून गावात गोगलगाईंचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. संपूर्ण शिवारात शेतात, रस्त्यावर या गोगलगाई दिसत आहेत. शेतातील उभ्या पिकांवर, झाडावरही त्या हल्ला करीत आहेत. उगवलेली लहान पिके या गोगलगाई खाऊन टाकत आहेत. शेतात केलेली विविध पिके गोगलगायी फस्त करत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या गोगलगाईंचे करायचे काय० असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

"मोठ्या पिकांवर गोगलगायी आहेतच. मात्र उगवलेली लहान-कोवळी पिके गोगलगायी फस्त करत आहेत. त्यामुळे शेतात नवीन पीक करता येत नाही. अन उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या गोगलगाईंचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला आता शेती करणे अवघड झाले आहे," अशी प्रतिक्रिया शेतकरी सतीश चोरघे, पांडुरंग चोरघे, हनुमंत चोरघे यांनी व्यक्त केली.

रहाटवडे गावात गोगलगाईंचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र त्याचा बंदोबस्त करण्याच्या उपाययोजना शेतकऱ्यांना सांगितलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत. नांगरणी व्यवस्थित करावी तसेच जैविक आणि रासायनिक औषधांच्या मदतीने गोगलगाईंचा बंदोबस्त करावा.
-एस. पी. कटके, कृषी मंडल अधिकारी

00887

Web Title: Todays Latest District Marathi News Khd22b01082 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..